नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तुम्ही पंतप्रधान होण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलंत- गोपीचंद पडळकर

0
157

सांगली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना नुकतेच पत्र लिहून पंतप्रधान होण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं आहे. मात्र, राजकीय तडजोडीमुळे भविष्यात त्यांचा ‘पाकधर्जिणा’ अशी ओळख असलेल्या नेत्यांमध्ये समावेश होण्याचा धोका आहे, असं वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. या संदर्भात गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.

एका पत्राद्वारे आपण काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या, युपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय राजकारणाची नांदी दिली. याबद्दल सर्वप्रथम आपले अभिनंदन. खासदार संजय राऊत यांना आपणास पंतप्रधान म्हणून बघण्याचे वेध केंव्हाच लागले आहेत आणि त्यांची मनोकामना पूर्ण होण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले, असं पडळकर यांनी पत्रात म्हटलं.

दरम्यान, या पत्रात त्यांनी उद्धव ठाकरे यांना त्यांच्या राजकीय भूमिकेविषयी काही प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांची उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिली नाही तर जनता काय ते समजून जाईल, असंही पडळकर यांनी या पत्रात म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“कुठून हे नग मिळतात?”; जितेंद्र आव्हाडांची भाजपाच्या माजी मुख्यमंत्र्यांवर टीका

लस घेताना केलेल्या ड्रामामुळे अभिनेत्री हिना पांचाळ झाली ट्रोल; पहा व्हिडिओ

“पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री गायब, देश रामभरोसे; अहंकार बाजूला ठेऊन महाराष्ट्र मॉडेल लागू करा”

“सर्वच जर केंद्राने करायचं तर राज्याने काय माशा मारायच्या का?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here