सांगली : ब्रेन बूस्टर अबॅकस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी ‘इंटरनॅशनल अबॅकस वर्ल्ड कप 2025’ या ऑनलाईन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत सांगली शहराचे नाव उज्वल केले. या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी भव्य बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन विजयसिंह राजे सभागृह, सांगली येथे करण्यात आले होते.
उद्घाटन पोलीस उपनिरीक्षक मा. प्रमोद खाडे साहेब यांच्या हस्ते झाले.रयत शिक्षण संस्थेचे प्राचार्य शिवाजीराव जाधव सर अध्यक्षस्थानी लाभले होते.
कार्यक्रमास मा. शैलेशभैय्या पवार (उपाध्यक्ष, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका, जनता पक्ष) आणि मा. सतीश पाटील (सीओओ, माई हुंडाई शोरूम, सांगली) यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच प्रा. बाळासाहेब पाटील (सांगली शिक्षण संस्था), लिगाडे सर (लठ्ठे एज्युकेशन) आणि सौंदत्ती सर या मान्यवरांचीही उपस्थिती लाभली.
ब्रेन बूस्टर अकॅडमीमधून प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी केवळ जलद गणना केली नाही, तर त्यांनी गणितात आत्मविश्वास, एकाग्रता, आणि मानसिक क्षमता वाढवली असल्याचे या कार्यक्रमातून दिसून आले.
अबॅकस ही शिक्षणपद्धती मुलांच्या समग्र बौद्धिक विकासाला चालना देणारी असल्याने, अधिकाधिक पालकांनी आपल्या पाल्यांना अशा प्रशिक्षणासाठी प्रोत्साहित करावे, असे प्रतिपादन मान्यवरांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे नियोजन संस्थेच्या संस्थापक प्रमिला साळुंखे मॅडम, उपसंस्थापक आफरीन रंगरेज मॅडम तसेच मार्गदर्शक शहाजी पोंडकुळे सर, महेश संकपाळ सर व किशोर सर यांनी उत्तम प्रकारे पार पाडले.
श्वेता शिकलगार मॅडम व वृषाली पाटील मॅडम यांच्या आयोजक म्हणून भुमिका अतिशय स्तुत्य राहिली.