मुंबई : मुंबईत 30 सप्टेंबरपर्यंत कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे.
मुंबईतील 144 कलम हे कोरोना मुळे नाही तर मराठा समाजातील आंदोलनामुळे मुंबईत लावण्यात आले आहे. मात्र, कलम लावून आंदोलनं दाबता येत नाहीत. तातडीची कॅबिनेट द्या, 1500 कोटी रुपये मराठा समाजासाठी घोषित करा, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, यावर्षी 642 कोर्सेस ना निम्मी फी सरकार भरणार हे घोषित करा, दहा लाखाचे कर्ज घेणाऱ्यांचे व्याज अण्णासाहेब पाटील महामंडळ भरते, ती संख्या वाढवा. व्याजाची तरतूद करा”, अशी मागणीही चंद्रकांत पाटलांनी केली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण”
आमच्यासोबत असताना शिवसेनेला मराठा आरक्षणात रस नव्हता; रावसाहेब दानवेंची शिवसेनेवर टीका
भाजपच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याचं प्रदीर्घ आजारानं निधन