दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या स्वार्थी नेत्याची देशाला गरज नाही, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.
लॉकडाउनदरम्यान किती कामगार स्थलांतरीत झाले PMतसेच किती कामगारांचे मृत्यू झाले? असा प्रश्न विरोधी पक्षाने लोकसभेत केंद्र सरकारला विचारला. यावर आपल्याकडे याची माहिती नसल्याचं केंद्र सरकारनं उत्तर दिलं आहे. यावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया देत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.
दरम्यान, मोदी सरकारला किती स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला हे ठाऊक नाही. तसंच ज्या डॉक्टरांना कोरोना योद्धे अशी उपमा देऊन त्यांच्यासाठी थाळीनाद आणि टाळ्या वाजवण्याचं आवाहन मोदींनी केलं होतं त्या डॉक्टरांपैकी किती डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू झाला याचीही माहिती मोदी सरकारकडे नाही. अशा स्वार्थी नेत्याचा आम्ही निषेध करतो, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
आधी आरक्षण आणि मगच भरती; मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून छत्रपती संभाजीराजे आक्रमक
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याची पायाभरणी”
मुंबईत जुन्या पासपोर्ट ऑफिसमध्ये स्फोट; आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश
“काॅंग्रेस नेते आणि उर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची लागण”