मुंबई : दादरच्या इंदूमिलमध्ये भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज दिनांक 18 सप्टेंबर दुपारी 3 वाजता पार पडणार आहे.
आंबेडकर स्मारकाच्या सुधारित संरचनेनंतर पादपीठ आणि पुतळ्याच्या पायाभरणीचा हा कार्यक्रम आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. आंबेडकर चळवळीतील कोणालाही आमंत्रित करण्यात आलेलं नाही, तसेच इतर मंत्र्यांना याची माहिती दिली नसल्याने नाराजीचा सूर असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांना इंदू मिलमधील पायाभरणी सोहळ्याचं आमंत्रण पाठवण्यात आलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
मुंबईत जुन्या पासपोर्ट ऑफिसमध्ये स्फोट; आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश
“काॅंग्रेस नेते आणि उर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची लागण”
यूएईचा कर्णधार विराट कोहलीच्या मदतीला; RCB ची भन्नाट कल्पना