Home क्रीडा यूएईचा कर्णधार विराट कोहलीच्या मदतीला; RCB ची भन्नाट कल्पना

यूएईचा कर्णधार विराट कोहलीच्या मदतीला; RCB ची भन्नाट कल्पना

दुबई : इंडियन प्रिमियर लीग 13 व्या हंगामाला शनिवार दिनांक 19 सप्टेंबर 2020 पासून सुरूवात होत आहे. प्रत्येक संघ जोमाने सराव करत आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुही जोमात सराव करत आहे. RCB ने आपल्या संघात सरावासाठी संयुक्त अरब अमिरातीचा क्रिकेट कर्णधाराचा आणि एका खेळाडूचा समावेश केला आहे.

यूएईचा कर्णधार अहमद रझा आणि युवा खेळाडू कार्तिक मयप्पन या दोघांना सरावासाठी RCB ने संघात समावेश करून घेतलं आहे. आरसीबीचा आयपीएलच्या 13 व्या हंगामातील पहिला सामना 21 सप्टेंबरला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे.

दरम्यान, या दोन्ही खेळाडूंना यूएईमधील परिस्थितीची माहिती आहे. खेळपट्ट्यांची जाण आहे. त्यामुळे या दोन खेळाडूंच्या अनुभवाचा फायदा निश्चितच फायदा होईल, अशी आरसीबीला आशा आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मुंबईतील संचारबंदीच्या आदेशाबाबत आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण; म्हणाले…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कधीच मराठा आरक्षणाला पाठिंबा नव्हता- नारायण राणे

ब्राह्मण असल्यानेच देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं जात आहे- प्रविण दरेकर

महाराष्ट्र सरकार मराठा समाजाच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम करत आहे का?- नितेश राणे