मुंबई : वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं कडक पावलं उचलली आहेत.
मुंबईत आज मध्यरात्री 18 सप्टेंबरपासून कलम 144 लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून या संदर्भात आदेश काढण्यात आले आहेत. मुंबईत 30 सप्टेंबरपर्यंत कलम 144 लागू राहणार आहे.
अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना या दरम्यान प्रवासाची मुभा असणार आहे. मात्र, त्यांना देखील फिजिकल डिस्टन्स ठेवणे, कमीत कमी सहा फुटांचे अंतर ठेवणे गरजेचे असल्याचं म्हटलं आहे. केवळ अत्यावश्यक काम असेल तरचं घराबाहेर पडावे. घराबाहेर फिरताना चेहऱ्यावर मास्क अनिवार्य आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
दरम्यान, वरील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. राज्य सरकार टप्प्या टप्प्याने राज्यातील निर्बंध शिथील करत आहे. एकप्रकारे राज्यातील व्यवहार सुरळित करण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र, वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा नियम कडक करण्यात आले आहेत.
महत्वाच्या घडामोडी-
माझी जात ब्राह्मण असल्यामुळे टार्गेट केलं जातंय- देवेंद्र फडणवीस
“कुणाच्या आईनं इतकं दूध पाजलंय की, उद्धव ठाकरेंना अयोध्येत रोखू शकेल”
उर्मिला मातोंडकर देखील सॉफ्ट पॉर्न स्टार आहे; कंगणाची उर्मिलावर खालच्या दर्जाची टीका
‘मराठा समाज व्यतिथ असताना नोकरी भरती का काढली?; संभाजी राजेंचा ठाकरे सरकारला सवाल