Home महाराष्ट्र जनतेच्या पैशातून ‘वाय प्लस’ सुरक्षा कशासाठी?; उर्मिला मातोंडकरांचा केंद्राला सवाल

जनतेच्या पैशातून ‘वाय प्लस’ सुरक्षा कशासाठी?; उर्मिला मातोंडकरांचा केंद्राला सवाल

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला केंद्र सरकारने वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली, यावरुन उर्मिला मातोंडकरने संताप व्यक्त केला आहे. एबीपी माझाच्या कार्यक्रमात उर्मिला मातोंडकर बोलत होत्या.

मॅडमना जी वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती त्याचे पैसे कोण देतं…तुमच्या आमच्यासारखा माणूस जो ‘अ‌ॅक्ट ऑफ गॉड’ म्हणून टॅक्सपासून पळून जाऊ शकत नाही. तो कसंही करुन टॅक्स भरतो. त्या करदात्यांच्या पैशातून हिला वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली गेली ती काय म्हणून दिली गेली होती, असा सावाल उर्मिलाने यावेळी केला आहे.

दरम्यान, काही लोकांबद्दल मनात द्वेष आहे म्हणून संपूर्ण इंडस्ट्रीला बदनाम करणं हे अतिशय आक्षेपार्ह आहे. इंडस्ट्रीने तुम्हाला घडवलं, इंडस्ट्रीने कित्येक जणांना त्यांचं घर, भाकर सगळं काही दिलं आहे. हे जे काही सुरु आहे ते सगळं वाईट आहे. कंगनावर बोलणंच मला गरजेचं वाटत नाही,” असंही उर्मिला मोतोंडकरने म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

अमरावतीच्या बाहेर निघून दाखवा; शिक्षण मंत्री उदय सामंत यांना धमकीचा फोन

‘ही’ शेतकऱ्यांशी बेईमानी नाही तर काय?; बच्चू कडू यांचा केंद्र सरकारला सवाल

मला बोलवा, मी कुठेही क्रिकेट खेळायला तयार आहे- एस श्रीसंत

कृपया आमचे पगार घ्या, पण खासदार निधी कापू नका; नवनीत राणा यांची लोकसभेत विनंती