घरातील चक्रव्यूह भेदून ‘राउडी धीरज’चा सुफला शॉट; वार्ड १२ मध्ये दणदणीत हॅट्रिक!

0
1265

सांगली | प्रतिनिधी

सांगली महापालिकेच्या वार्ड क्रमांक १२ मध्ये अखेर धीरज यांनी इतिहास रचला आहे. आतेभाऊ विरुद्ध धीरज असा रंगलेला घरातील संघर्ष, रॅश ट्युशनप्रकरणी निर्माण झालेले तणाव आणि विरोधकांची राजकीय कोंडी — या सर्व अडथळ्यांवर मात करत धीरज यांनी दणदणीत विजय मिळवत हॅट्रिक पूर्ण केली आहे.

धीरज यांच्याविरोधात काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांनी पूर्ण ताकद लावत आपझिशन उमेदवार मनोज फराणे यांना मैदानात उतरवले होते. मात्र, संघटनांची मोट बांधूनही विरोधकांना मतदारांचा कौल मिळवता आला नाही.

घरातील मतभेद, राजकीय दबाव आणि बाहेरील टीका यांना न जुमानता धीरज यांनी शेवटपर्यंत संयम राखला. थेट संपर्क, स्थानिक प्रश्नांवरील पकड आणि कार्यकर्त्यांची फौज यामुळे मतदारांनी पुन्हा एकदा धीरजांवर विश्वास टाकला.

या विजयासह धीरज यांनी वार्ड १२ मध्ये हॅट्रिक साधत आपली राजकीय ताकद पुन्हा सिद्ध केली आहे.

सांगलीच्या राजकारणात हा निकाल केवळ विजय नाही, तर घरातील विरोधालाही दिलेला ठाम संदेश ठरतो आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here