पुणे – शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कोथरुड विधानसभा युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. या भेटीदरम्यान गुरनानी यांनी त्याच्या आतापर्यंत केलेल्या कार्याचा अहवाल शरद पवार यांच्यापुढे सादर केला. शरद पवार यांनी गिरीश गुरनानींच्या कामाचे कौतुक करुन गुरनानींना कानमंत्र दिला.
गिरीश गुरनानी हे कोथरुडमधील नागरिकांच्या समस्यावरुन सत्ताधाऱ्यांवर सतत निशाणा साधत असतात. मोर्चे, आंदोलने करुन नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करत असतात. तसेच अनेक सामाजिक उपक्रम ते वेळोवेळी राबवत असतात. या सर्व कामांची दखल शरद पवार यांनी घेतली, अशी माहिती गुरनानी यांनी दिली. जसे जनता दखल घेत असते तसेच पक्षातील वरिष्ठही घेतात हीच माझ्यासाठी प्रेरणादायी बाब आहे, असे यावेळी गिरीश गुरनानी यांनी सांगितले.

