“पंढरपूरमध्ये भाजपला मोठा धक्का, खंद्या समर्थकानं घेतली शरद पवारांची भेट; राजकीय चर्चांना उधाण”

0
665

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे.

पंढरपूरमधील माजी नगराध्यक्ष साधना भोसले यांचे पती माजी उपनगरध्यक्ष नागेश भोसले यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

हे ही वाचा : ‘उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल, तर…’; किरीट सोमय्यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

दरम्यान, नागेश भोसले यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं ते राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. तसेच भोसले हे भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यामुळे भोसले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास भाजपला मोठा धक्का बसणार आहे.

महत्वाच्या घडामोडी –

पुण्यात होणार मनसेचा वर्धापनदिन सोहळा; मनसेची जोरदार तयारी सुरू

“केंद्रीय एजन्सीज या भाजपच्या प्रचार यंत्रणा, पण महाराष्ट्र यांच्यापुढे झुकणार नाही, थांबणार नाही”

आता मनसेकडूनही नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी; कोकण भवन कार्यालयासोमर काढला भव्य मोर्चा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here