ठाकरे सरकार पळपुटं सरकार, हे आज सिद्ध झालंय; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

0
289

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवसाचं अखेरचं सत्र प्रचंड गाजलं. विधानसभेत आणण्यात आलेल्या आणि मंजूर करण्यात आलेल्या विद्यापीठ दुरुस्ती विधेयकावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

आजचा दिवस महाराष्ट्राच्या लोकशाहीतला सर्वात काळा दिवस आहे. ठाकरे सरकार पळपुटं सरकार, हे आज सिद्ध झालंय, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. सभागृहातून बाहेर आल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.

हे ही वाचा : तुम्हांला ‘ते’ जमलं नाही, निदान नाच्याचं काम तरी चांगलं करा आणि नाव कमवा; भास्कर जाधवांचा राणेंवर पलटवार

विद्यापिठाच्या कायद्यावर चर्चा सुरु असताना जाणीवपूर्वक आणि ठरवून चर्चा न करता हे विधेयक मंजूर करुन घेण्याचं पाप सरकारनं केलं, सरकारनं केलेल्या पापमध्ये विधानमंडळाचं सचिवालयही सामील असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

दरम्यान, आतापर्यंतच्या कुठल्याही कायद्यातून मंत्र्यांना विद्यापीठाच्या प्रशासकीय बाबतीत ढवळाढवळ करण्याची तरतूद नव्हती. विद्यापीठं राजकारणापासून दूर ठेवली गेली होती. पण उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी स्वतःला प्र-कुलपती म्हणवून घेतलं आहे. विद्यापीठाच्या प्रशासकीय आणि ऍकेडमिक बाबींमध्ये आता सरकारला हस्तक्षेप करायचा आहे, म्हणून हे केलं गेलं, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी – 

 महाविकास आघाडी सरकारमधील ‘इतके’ आमदार नाराज; बावनकुळेंनी केला खुलासा

“12 निलंबित आमदारांवरून अजित पवारांचा भाजपला टोला, म्हणाले… कारवाई करा, पण…”

“कट्टर शिवसैनिक सुमंत रूईकरच्या कुटूंबाला शिवसेनेतर्फे 5 लाखांची मदत, तसेच कुटूंबाची घेतली जबाबदारी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here