संजय राऊतांसोबत केलेल्या डान्सवर टीका करणाऱ्यांना सुप्रिया सुळेंनी दिलं जोरदार उत्तर; म्हणाल्या…

0
1888

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत यांचा विवाह सोहळा पार पडला. या विवाहाच्या निमित्ताने नुकताच संगीत सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मिडियात जोरदार व्हायरल झाला होता. यानंतर सुप्रिया सुळेंवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. यावरून आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : ममता बॅनर्जी आजपासून 3 दिवस मुंबई दाैऱ्यावर, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची घेणार भेट; चर्चांना उधाण

तो एक कौटुंबिक कार्यक्रम होता, बाहेरचं कुणीच नव्हतं. एखाद्या खासगी कार्यक्रमात आम्ही काय करतो त्यावर पण जर कुणाला टीका करायची असेल तर त्यावर काय बोलणार?., असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसंच ते आमच्या घरातल्या मुलीचं लग्न होतं असंही सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हटलं. त्या एबीपी माझाशी बोलत होत्या.

महत्वाच्या घडामोडी –

गिरीश महाजन म्हणाले, शिवसेनेसोबतचा आमचा 25 वर्षांचा संसार तोडला, आता जयंत पाटील म्हणतात…

राज्यातील निर्बंध वाढणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मोठं विधान, म्हणाले…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here