भाजपचे अनेक नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असून भाजपला मोठे खिंडार पडणार ; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा दावा

0
698

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजपचे अनेक नगरसेवक शिवसेना  नेत्यांच्या संपर्कात असून डिसेंबरमध्ये भाजपला खिंडार पडेल, असा दावा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला .

हे ही वाचा : “मनसेत पक्षप्रवेशाचा धुमधडाका, कोल्हापुरात अनेक तरूणांचा मनसेत प्रवेश”

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मनमानी कार्यपद्धतीमुळे अनेक नगरसेवक अक्षरशः कंटाळले असून ते लवकरच पक्षाला रामराम ठोकणार आहेत. हे पाहता आपले नगरसेवक फुटण्याच्या धसक्यानेच भाजपचे वरिष्ठ नेते शिवसेनेवर बिनबुडाचे आरोप करीत आहेत, असा आरोप करत यशवंत जाधव यांनी भाजपचे अनेक नगरसेवक शिवसेना  नेत्यांच्या संपर्कात असून डिसेंबरमध्ये भाजपला खिंडार पडेल, असं वक्तव्य केलं आहे.

दरम्यान, आपले नगरसेवक फुटू नयेत यासाठी वरिष्ठ नेत्यांकडून दबाव आणत त्यांना धमकविण्यात येत आहे. असा आरोपही यशवंत जाधव यांनी भाजपवर केला .

महत्वाच्या घडामोडी –

उद्या सांगलीत भव्य पक्षप्रवेशाचा सोहळा; शेकडो कार्यकर्ते करणार राष्ट्रवाीदत प्रवेश

चंद्रकांत पाटलांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख; राष्ट्रवादीकडून जोरदार प्रत्युत्तर

“शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्यांची बाळासाहेब ठाकरेंनी पक्षातून हकालपट्टी केली”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here