राणे म्हणतात, आता उद्धव काळ संपला; संजय राऊत म्हणाले…

0
562

मुंबई : काल मुंबईमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भेट देत जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. यावेळी बोलताना उद्धव काळ आता संपला आहे, असं वक्तव्य नारायण राणेंनी केलं होतं. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

पत्रकारांनी संजय राऊत यांना घडलेल्या घटनांचा संदर्भ देत प्रश्न केला असता, नाही असा प्रकार झाल्याचे माझ्या वाचनात आलेले नाही, हा स्थानिक विषय असून यावर आमचे शाखा प्रमुख, नगरसेवक उत्तर देतील, असं म्हणत संजय राऊत यांनी अधिकचं बोलणं टाळलं.

दरम्यान, महाराष्ट्रातील सरकारने गेल्या अडीच वर्षात कोणताही विकास केलेला नाही. उद्धव ठाकरे हे राज्याला उद्वस्त करत आहेत. आता हे सरकार हटविण्याची वेळ आली आहे. या सरकारचा काळ आता संपला आहे, महाराष्ट्रात पुन्हा भाजपचं सरकार येणार, असा दावा नारायण राणेंनी यावेळी केला होता.

महत्वाच्या घडामोडी –

“शिवसैनिकांची कृती म्हणजे बुरसटलेली तालिबानी मानसिकता”

आम्ही निघून गेल्यानंतर गोमूत्र शिंपडलं, समोर असता तर तेच गोमूत्र…; निलेश राणेंचा हल्लाबोल

“आमदार गोपीचंद पडळकरांनी करून दाखविलं, पोलिसांना गुंगारा देत अखेर बैलगाडी शर्यत संपन्न”

अडवण्याची भाषा करणाऱ्यांनी पुढच्या वेळी चड्डीत राहायचं; नितेश राणेंचा घणाघात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here