“रिकामटेकडे दौरा करतात की टीका करतात, हे महाराष्ट्राची जनता पाहतेय”

0
233

मुंबई : राज्यातील पूरपरिस्थितीवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्ष मोकळे आहेत. मोकळा माणूस असतो. डोकं रिकामं असतं. असे आरोप करत असतात. त्यांनाही माहीत आहे. त्यांनीही सरकार चालवलंय, त्यांनीही शासन चालवलंय, अशी टीका संजय राऊत यांनी यावेळी केली. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत यांनी बोलताना उक्ती आणि कृती याचं तारतम्य बाळगावं. एवढ्या पूरग्रस्त परिस्थितीत राऊत कधी पाण्यात उतरले का?, कुठे पाहणी करायला गेले का?, केवळ मीडियात येऊन वेगवेगळी वक्तव्य करणं अश्रू पुसणं हे वेगळं आहे. तोक्ते निसर्ग वादळात आम्ही साईटवर गेलो होतो. आता रिकामटेकडे दौरा करतात की टीका करतात हे महाराष्ट्राची जनता पाहते आहे, असा हल्लाबोल दरेकर यांनी केला.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस ग्रासरूटचे नेते आहेत. सर्वसामान्य जनतेचा कानोसा राऊतांनी घ्यावा, असा सल्लाही दरेकरांनी यावेळी राऊतांना दिला.

महत्वाच्या घडामोडी –

विरोधी पक्ष मोकळा आहे, डोकं रिकाम असतं, आरोप करतच असतात; संजय राऊतांचा टोला

कुठेही जा, तुमची ओळखही शिवसैनिक म्हणूनच; शिवसेनेचा नारायण राणेंना टोला

“महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह हरपला; जयंत पाटलांकडून गणपतराव देशमुखांना श्रद्धांजली अर्पण”

राजकारणातील एक साधं आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपलं- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here