मुंबई : गेल्या काही दिवसात घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अभिनेत्री कंगना रणाैतची भेट घेण्याचा निर्णय घेतला. कंगनाच्या राहत्या घरी खार इथे त्यांनी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
मुंबई ही सर्व पक्षाची आणि सर्वांची आहे. मुंबईत राहण्याचा सर्वांना अधिकार आहे. कंगनाला मुंबईत घाबरण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली.
माझं फर्निचर, वॉल तोडली आहे. मी कोर्टमध्ये जाणार आहे. मला महापालिकेकडून भरपाई मिळाय़ला हवी. कंगनानी मला या गोष्टी सांगितल्या. माझी कंगनासोबत खूप विषयावर चर्चा झाली. कंगनाला उगाच त्रास झाला आहे. त्यामुळे मी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार आहे. तसेच याप्रकरणी मुंबई महापालिका आयुक्तांशी चर्चा करणार आहे, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कंगना ड्रग्स घेत होती हे सामनात कसं छापलं, असा प्रश्न रामदास आठवलेंनी उपस्थित केला. शिवसेना खासदार संजय राऊत आणि सामनावर केस व्हायला हवी, असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; मराठा समाजाने संयम बाळगावा- अशोक चव्हाण
“मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची लागण”
बाळासाहेबांची विचारधारा विकून शिवसेनेची ‘सोनिया सेना’; कंगणा रणाैतचा उद्धव ठाकरेंना खडेबोल