मुंबई : अभिनेत्री कंगना रणाैतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगणा रणाैतला कंगनाने मुंबई सोडावी, असा सल्ला दिला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून कंगनाने मी 9 सप्टेंबरला मुंबईत येत आहे, असं इशारा दिला होता. त्यानुसार कंगणा मुंबईत दाखल झाली. कडेकोट पोलीस बंदोबस्तात कंगना विमानतळावरुन पाली हिल इथल्या घराकडे दाखल झाली. यानंतर कंगनाने ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली.
उद्धव ठाकरे तुला काय वाटतं, तुम्ही फिल्म माफियासोबत माझं घरं तोडून फार मोठा बदला घेतला. आज माझं घरं तोडलं आहे. उद्या तुझा गर्व तुटेल, असं म्हणत कंगनाने उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र केलं आहे.
दरम्यान, अशा प्रकारे कंगणाने ट्विट करत उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर निशाणा साधला.
तुमने जो किया अच्छा किया #DeathOfDemocracy pic.twitter.com/TBZiYytSEw
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
महत्वाच्या घडामोडी-
…तर पुढचं अधिवेशन मातोश्रीच्या गच्चीवर घ्यावं; नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
राज्याच्या इतिहासातील आजचा दिवस हा काळा दिवस; चंद्रकांत पाटलांची राज्य सरकारवर टीका
राज्याच्या इतिहासातील आजचा दिवस हा काळा दिवस; चंद्रकांत पाटलांची राज्य सरकारवर टीका
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती