“संत आणि हिंदू धर्माच्या आस्थेचा अपमान करणं, ही काँग्रेसची जुनी परंपरा आहे”

0
331

पुणे : श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट मंदिर निर्माणासाठी नव्हे तर एका राजकीय पक्षासाठी निधी गोळा करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते सचिन सांवत यांनी आहे. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलय.

मला काँग्रेसच्या या आरोपांबद्दल जराही आश्चर्य वाटले नाही. कारण, संत आणि हिंदू धर्माच्या आस्थेचा अपमान करणं, ही काँग्रेसची जुनी परंपरा आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राम जन्मभूमी ट्रस्टवर आरोप करण्यापूर्वी आधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी 1.11 लाख रुपये आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी 11 चांदीच्या विटा या राम मंदिरासाठी दिल्या आहेत? की एखाद्या पक्षाला वर्गणीच्या रुपात दिल्या आहेत ? हे काँग्रेसने आपल्या नेत्यांना सुद्धा विचारावं, असंही चंद्रकातं पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

लोकल ट्रेनचा फायदा नक्की कोणाला? सर्वसामान्य जनतेला की…; राम कदमांची टीका

रामाच्या नावाने चंदा हाच भाजपाचा धंदा- सचिन सावांत

“राज ठाकरेंचा अयोध्येला जाण्याचा निर्णय योग्य, सगळ्यांनीच अयोध्येला गेलं पाहिजे, मी सुद्धा जाणार”

मनसेने आतापर्यंत कितीवेळा भूमिका बदलली आहे, हे राज ठाकरेंनाही सांगता येणार नाही- सचिन सावंत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here