“भेंडीबाजार म्हटलं की सिल्व्हर ओकला आणि बेहराम पाडा म्हटलं की मातोश्रीला त्रास होतो”

0
519

मुंबई : विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते  प्रविण दरेकर यांच्या वर्षभराच्या लेखाजोखाचं प्रकाशन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना भाजप नेते आशिष शेलार यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर  टीका केली आहे

भेंडीबाजार म्हटलं की सिल्व्हर ओकला आणि बेहराम पाडा म्हटलं की मातोश्रीला त्रास होतो, असं म्हणत आशिष शेलारांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.

दरम्यान, जो जनतेसाठी काम करतो, तोच जनतेसमोर त्या कामाची मांडणीही ठासून करु शकतो. प्रविण दरेकरांनी जास्तवेळ विरोधी पक्षनेते राहू नये एवढीच इच्छा. देवेंद्रजी हे राजकारणातले कृष्ण आहेत. आता मात्र सुदर्शन चक्र काढावेच लागेल. ते सुदर्शन चक्र यशवंतराव चव्हाण सभागृहातूनच काढा, असंही आशिष शेलारांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

सीमाभाग महाराष्ट्राचाच! मुख्यमंत्र्यांनी दिला पुरावा

चावटपणा करणाऱ्याची चौकशीच नाही तर त्याला शिक्षाही झाली पाहिजे; गुलाबराव पाटील कडाडले

“माझा होशिल ना फेम आदित्य ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात”

भाजपला जेंव्हा कुणी विचारत नव्हतं तेंव्हा…- प्रीतम मुंडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here