“… म्हणून मी तक्रार मागे घेतेय”; रेणु शर्मांचा मोठा खुलासा

0
535

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्माने सर्व आरोप मागे घेतले आहेत. रेणू शर्माने यांनी संदर्भात यांनी ट्विट केलं आहे.

काही लोक माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या चालवत आहेत. हे सर्व चुकीचं आहे. मला माझ्या घरातील माणसांची नावं खराब करायची नाहीत. शेवटी मी इतकंच सांगेल की मी धनंजय मुंडे यांच्या विरोधातील सर्व तक्रारी मागे घेत आहे. मला त्यांच्याविरोधात कोणतीही तक्रार करायची नाहीये, असं रेणू शर्मा म्हणाल्या.

माझी लग्नाचं आश्वासन न पाळण्याची किंवा बलात्काराची कोणतीही तक्रार नाही. तसेच माझा कोणताही अयोग्य फोटो किंवा व्हिडीओ देखील नाही. मी हे सर्व अगदी विचारपूर्वक सांगत आहे, असंही रेणु शर्मा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

सीरमच्या आगीमागे घातपात होता की अपघात हे चौकशीनंतर कळेल- उद्धव ठाकरे

कोणी कितीही दावे केले तरी…; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

हेच का राष्ट्रवादीचे महिला धोरण?; तृप्ती देसाई यांचा सवाल

धनंजय मुंडे प्रकरणवरुन संजय राऊतांचा भाजपला सल्ला; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here