मुंबई : राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आज आमदार रोहित पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करत विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षनेत्यांवर जोरदार टीका केली आहे.
विरोधी पक्षनेते भाजपाकडून शिवसेनेला आपलंसं करून घेण्याचा प्रयत्न होतोय. मात्र तसा प्रयत्न करुन काहीही उपयोग नाही. कारण, शिवसेना आमदार हे बाळासाहेबांचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याप्रमाणेच निर्णयावर ठाम असणार आहेत, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मला विरोधी पक्षांना एक गोष्ट सांगायची आहे. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव जसं तुम्ही घेता त्याचप्रमाणे आम्हीसुद्धा घेतो. बाळासाहेब ठाकरे निर्णयाला ज्याप्रमाणे ठाम राहिले असते, त्याचप्रमाणे त्यांचे हे सर्व कार्यकर्तेही ठाम राहतील. ते तुटतील पण तुमच्यासमोर वाकणार नाहीत. त्यामुळे कुणीही असा प्रयत्न करू नये, असं म्हणत रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
भाजपा हा भेदभाव लक्षात ठेवेल; चंद्रकांत पाटलांचं रामराजे निंबाळकरांना पत्र
“भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना कोरोनाची लागण”
“अजित पवारांच्या पायगुणामुळे आमची सत्ता गेली”
शॉर्टकट मारावे लागले की रात्री कामे करावी लागतात; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला