Home महाराष्ट्र भाजपा हा भेदभाव लक्षात ठेवेल; चंद्रकांत पाटलांचं रामराजे निंबाळकरांना पत्र

भाजपा हा भेदभाव लक्षात ठेवेल; चंद्रकांत पाटलांचं रामराजे निंबाळकरांना पत्र

मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांना पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात त्यांनी उपसभापती निवडणूक प्रकरणी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

दुजाभाव व प्रभावाखाली काम करण्याचा आपण कळस गाठला आहे.पण भाजपा हा भेदभाव लक्षात ठेवेल. भाजप विरूद्ध तुम्ही कितीही षडयंत्र रचलीत तरी तुम्ही त्यात यशस्वी होणार नाही, असं चंद्रकांत पाटलांनी पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, करोनामध्ये उपसभापतीची निवडणूक? भाजपाचे तीन सदस्य कोविड बाधित तरीही निवडणूक? सभागृहात 78 च्या ऐवजी 60 सदस्य उपस्थित तरीही निवडणूक? कोर्टात केस पेंडिंग, तरीही निवडणूक? आश्चर्य आहे. एक निस्पृह व्यक्तीमत्व म्हणून आपल्याबद्दल आमच्या मनात असलेला आदर आज निश्चितच कमी झाला आहे, असंही पत्रात म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना कोरोनाची लागण”

“अजित पवारांच्या पायगुणामुळे आमची सत्ता गेली”

शॉर्टकट मारावे लागले की रात्री कामे करावी लागतात; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

… तर आम्ही घरी जातो; हक्कभंग प्रस्तावावरुन देवेंद्र फडणवीस आक्रमक