Home महाराष्ट्र शॉर्टकट मारावे लागले की रात्री कामे करावी लागतात; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

शॉर्टकट मारावे लागले की रात्री कामे करावी लागतात; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

मुंबई : विधीमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाची सांगता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणाने झाली. यावेळी बोलताना शॉर्टकट मारावे लागले की रात्री कामे करावी लागतात असा अप्रत्यक्ष टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

मुंबईत जन्मलेली पहिली व्यक्ती महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभली हे मी माझं भाग्य समजतो. मुंबईकरांसाठी आपण अनेक गोष्टी आणणार असून जनसंपत्तीसह वनसंपत्तीही महत्त्वाची आहे. पर्यावरणाचा-हास होता कामा नये. काम करताना कोणताही अहंकार असता कामा नये. त्याचप्रमाणे शॉर्टकटही मारु नये, अन्यथा रात्रीच्या अंधारात झाडे कापावी लागतात. अशाच अनेक गोष्टी कराव्या लागतात, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, जी कामं करायची ती आम्ही दिवसा ढवळ्या करतो, रात्रीच्या अंधारात नाही. प्रत्येक पाऊल शांततेने उचलावं लागणार आहे, ओरडून बोलल्याने करोना होतो, असंही  उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

… तर आम्ही घरी जातो; हक्कभंग प्रस्तावावरुन देवेंद्र फडणवीस आक्रमक

शिवसेना प्रवक्त्यांची यादी जाहीर, संजय राऊत मुख्य प्रवक्ते; तसेच ‘या’ 10 जणांना स्थान

आम्ही विचार केला त्यापेक्षा ते जास्त नॉटी आहेत; अमृता फडणवीसांचा संजय राऊतांना टोला

…तर एकाही अधिकाऱ्याला गाडीत फिरू देणार नाही; रूपाली पाटील ठोंबरेंचा पालिकेला इशारा