सांगलीतील कोरोना मृत्यूचे प्रमाण देशात सर्वाधिक- देवेंद्र फडणवीस

0
207

सांगली : विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मिरजेतील कोविड रुग्णालयाला भेट दिली. यावेळी सांगली जिल्ह्य़ातील कोरोना मृत्यूचे प्रमाण 4.1 टक्के असून हे देशात सर्वाधिक आहे. अशा स्थितीत शासन आणि मंत्री गंभीर दिसत नसल्याचं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

सांगलीतील कोरोना मृत्युदर हा अन्य जिल्ह्य़ापेक्षाच नव्हे तर देशात सर्वाधिक आहे. संसर्गाचे प्रमाण 16 टक्के आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी रुग्णालयामध्ये अतिरिक्त व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून द्यावी लागणार आहेत, चाचण्यांचा वेग वाढवावा लागणार आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, मिरजेतील कोविड रुग्णालयाला भेट दिल्यानंतर फडणवीस यांनी जिल्ह्य़ातील करोना स्थितीबाबत जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याशी चर्चा केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.

महत्वाच्या घडामोडी-

राज्य सरकारने आता अँटीबॉडी टेस्टवर जास्त भर द्यावी; मनसेची मागणी

न्याय की चक्की थोडी धीमी ज़रूर चलती है, पर…; सुशांत सिंग प्रकरणावर अमृता फडणवीसांच ट्विट

“राज ठाकरेंचा न्यू लूक सोशल मिडियावर व्हायरल”

मंदिरे बंद करावी हा निर्णयच केंद्राचा; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here