“महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला कवडीचीही किंमत नाही”

0
162

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये आपल्याला कवडीचीही किंमत नाही हे काँग्रेस नेत्यांना ठाऊक आहे, असं वक्तव्य भाजप नेते केशव उपाध्ये यांनी केलं आहे.

“भाजपा कार्यालयावर मोर्चा काढण्याऐवजी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांवर दबाव आणून असे पॅकेज जाहीर करायला लावावं. पण तेवढे धाडस काँग्रेस नेते दाखवणार नाहीत. कारण आपल्याला मुख्यमंत्री विचारणार नाहीत. म्हणूनच ते भाजपा कार्यालयावर मोर्चा काढण्याचा केविलवाणा स्टंट करत आहेत, असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

“केंद्र सरकारने महाराष्ट्राला विविध माध्यमातून 28 हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची थेट मदत दिली आहे. याउलट महाविकास आघाडी सरकारने राज्यात एका कवडीचेही पॅकेज गोरगरिबांना दिलेले नाही. काँग्रेसला जनतेचा खरंच कळवळा असेल तर काँग्रेस नेत्यांनी भाजपा कार्यालयावर मोर्चा काढण्याऐवजी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणून गरिबांसाठी पॅकेज जाहीर करायला भाग पाडावं, असं केशव उपाध्ये म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“शरद पवारांचं बोलणं हे आजोबांचा सल्ला म्हणजे आशीर्वाद यादृष्टीने घेतलं तर मनावरचा ताण कमी होईल”

ठाकरे कुटुंबीयांना बदनाम करण्याचा प्रयत्न जर कोणी करत असाल तर…; शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्याचा इशारा

…नाहीतर 15 ऑगस्टला धनंजय मुंडे यांच्या गाडीखाली जीव देणार

यापुढे रावसाहेब दानवे यांचा जावई असा उल्लेख करू नका, आमचा आता कोणताही संबंध नाही- हर्षवर्धन जाधव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here