मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मातोश्री निवासस्थान उडवून देण्याची धमकी दाऊद इब्राहिमच्या हस्तकानं केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन आल्याची माहिती समोर आली आहे. यावरून आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
धमकीच्या फोनबाबत नीट चौकशी झाली पाहिजे. हे फोन खरे आहेत की कुणी जाणीवपूर्वक करत आहे, या सर्व गोष्टींची चौकशी झाली पाहिजे. ज्यांना धमकीचे फोन आले आहेत, त्यांची प्रशासनाने विशेषत: पोलिसांनी त्यांची काळजी घेतली पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
मला महाराष्ट्र आवडतो; कंगणा रणाैतचं मराठीतून ट्विट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनंतर आता शरद पवार आणि गृहमंत्र्यांना धमकीचे फोन
तुकाराम मुंढे यांची कोरोनावर मात; स्वत: ट्विट करत दिली माहिती
“एमपीएससीकडून परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर”