Home देश 21 दिवसात कोरोनाला हरवण्यात देश अपयशी का ठरला?; पी. चिदंबरम यांचा मोदींना...

21 दिवसात कोरोनाला हरवण्यात देश अपयशी का ठरला?; पी. चिदंबरम यांचा मोदींना सवाल

नवी दिल्ली : वाढच्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांत कोरोना व्हायरसला हरवू असं म्हटलं होतं. त्यावर केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी प्रतिक्रिया देत  मोदींवर निशाणा साधला आहे.

मी भविष्यवाणी केली होती की 30 सप्टेंबरपर्यंत कोरोना संक्रमितांची संख्या 55 लाखापर्यंत पोहचेल. पण मी चुकीचा ठरलो. भारत 20 सप्टेंबरपर्यंत या आकड्याजवळ पोहचेल. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत देशातील कोरोना संक्रमितांची संख्या 65 लाखांपर्यंत पोहचेल, असं पी.चिदंबरम यांनी ट्विट करत नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.

लॉकडाऊन रणनीतीचा फायदा न घेणारा जगातील एकमेव देश भारत असल्याचे दिसत आहे. पंतप्रधान मोदी यांनी 21 दिवसांत कोरोना व्हायरसला हरवू असे म्हटले होते. मग अन्य देशांना यश आलं असताना भारत अपयशी का ठरला? असा सवालही पी. चिदंबरम यांनी केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

युद्ध झाल्यास भारत अजिबात जिंकणार नाही- चीन

केंद्र सरकार पुणेकरांच्या पाठीशी ठामपणे उभं; कन्टेंन्मेंट झोनमध्ये अँटिजेन टेस्ट वाढवण्याची गरज- प्रकाश जावडेकर

आबांच्या सुपुत्रासोबत आता पत्नी सुमन पाटील यांनाही कोरोनाची लागण

माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्या हॅकर मनिष भंगाळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कशासाठी भेटले?; एकनाथ खडसेंचा सवाल