“Goa Election! शिवसेना खासदार संजय राऊत-काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट, राजकीय चर्चांना उधाण”

0
327

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पणजी : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची आज पणजी येथे भेट झाली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

तब्बल दीड तास झालेल्या या चर्चेत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबाबत अद्याप माहिती अजून समोर आली नाही. तसेच गोवा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे. तसेच या भेटीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलं.

हे ही वाचा : “युवासेना उपसमन्वयक योगेश देवकुळे यांच्या THE R.E. ENGINE या संशोधनात्मक कल्पनेची पर्यावरण मंत्रालयाने घेतली दखल”

संजय राऊत यांनी या भेटीचा फोटो शेअर केला असून फक्त ‘हम’.. एवढा एकच शब्द लिहिला आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने युती केली असून काँग्रेस स्वबळावर लढत आहे. मात्र संजय राऊत यांच्या या ट्वीटमुळं खळबळ उडाली असून काँग्रेसला शिवसेनेचा पाठिंबा असेल का?, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“राष्ट्रवादीचा काँग्रेसला धक्का, औरंगाबादमधील ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं घड्याळ”

“जळगावमध्ये 50 रूपयांच्या उधारीसाठी पुतण्यानं घेतला काकाचा जीव”

आगामी महापालिकांमध्ये मनसेला किंग बनायचंय, किंग मेकर नाही; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here