मुंबई : काँग्रेसमध्ये नेतृत्वबदल होणार की गांधी कुटुंबातीलच अध्यक्ष राहणार हा वाद गेले काही दिवस चालला आहे. यावरुन रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करुन त्यांनाच काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद देण्यात यावं अशी मागणी केली आहे.
काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास सध्या राहुल आणि सोनिया गांधीही तयार नाहीत. माझी काँग्रेसला सूचना आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस मध्ये विलीन करून शरद पवार यांना काँग्रेसचे अध्यक्ष करावं, असं रामदास आठवले यांनी म्हटलंय.
दरम्यान, याबाबतचा निर्णय शरद पवार आणि काँग्रेस यांनी घ्यावा, असंही रामदास आठवले म्हणाले.
काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास सध्या राहुल आणि सोनिया गांधीही तयार नाहीत. माझी काँग्रेसला सूचना आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस मध्ये विलीन करून शरद पवार यांना काँग्रेस चे अध्यक्ष करावे.याबाबतचा निर्णय पवार आणि काँग्रेस यांनीघ्यावा.@PawarSpeaks@RahulGandhi
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) September 5, 2020
महत्वाच्या घडामोडी-
कंगना रणौतसोबत माझं काही व्यक्तीगत भांडण नाही, पण…-संजय राऊत
अखेर कंगणा रणाैतचा सूर बदलला; म्हणाली, जय मुंबई, जय महाराष्ट्र
मुंबई कोणाच्या बापाची आहे हे सांगण्यासाठी आम्ही आलो असतो पण…, रूपाली चाकणकरांचं कंगणावर टीकास्त्र
…तर आज ही वेळ आली नसती; सामना अग्रलेखातून फडणवीस सरकारवर निशाणा