मी वाघ आहे वाघ, कशी ते तुमच्या बापाला जाऊन विचारा; चित्रा वाघ यांचा जोरदार पलटवार

0
590

मुंबई : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्यावर केलेल्या आरोपाने ते अडचणीत सापडले होते. यावर बोलताना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी लंकेंवर जोरदार हल्लाबोल केला होता. यावरून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी प्रतिक्रिया देत चित्रा वाघ यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

अहो चित्रा वाघ, लाचखोर नवऱ्याची बायको ही तुमची महाराष्ट्राला ओळख आहे. अगोदर नीतिमत्ता तुमच्या नवऱ्याला शिकवा नंतर आम्हाला शिकवा, असो जोरदार हल्लाबोल मेहबूब यांनी यावेळी केला. यावरून आता चित्रा वाघ यांनी पलटवार केला आहे.

वाघावर…..कोल्हे कुत्रे भुंकताहेत. कारण मी पिडीतांच्या पाठीशी उभी रहाते म्हणून सत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल करून झाले आता माझ्या परीवाराची बदनामी सुरू मी काय आहे….काय नाही हे तुमच्या बापाला जाऊन विचारा आणि मग या वाघ आहे मी लक्षात ठेवा….कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही”, असा जोरदार पलटवार चित्रा वाघ यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

“मुंडेंनी कितीही स्वतःला वाचवायचा प्रयत्न केला, तरी एक दिवस नियती त्यांना सोडणार नाही”

“लाचखोर नवऱ्याची बायको म्हणून तुमची राज्याला ओळख, नीतिमत्ता कुणाला शिकवताय?”

“करूणा मुंडे यांच्याविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल”

धनंजय मुंडेंनी जबरदस्तीने रिव्हाॅल्व्हर माझ्या गाडीत ठेवली; करूणा मुंडेंचा आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here