मुंबई : मंदीर उघडण्याच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यासंदर्भात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.
सरकारने मंदिरं सगळ्यात शेवट उघडून उगाच नको ते पुरोगामीत्व दाखवू नये त्यापेक्षा एक नियमावली आखावी आणि हिंदुजनांच्या मंदिर प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा. पण तरीही सरकारने जर ह्या विषयी लवकरात लवकर सकारात्मक पाऊल उचललं नाही तर आम्हाला नाईलाजाने सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल, असा इशारा राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे.
सध्या महाविकास आघाडी सरकारचं काही बाबतीतील धोरणशैथिल्य हे फारच बुचकळ्यात टाकणारं आहे. ह्या सरकारच्या डोळ्यावर कुठल्या गुंगीची झापड आली आहे की ज्यामुळे गेले अनेक दिवस श्रद्धाळू हिंदू भाविकांचा सुरु असलेला कंठशोष सरकारच्या कानावर पडत नाहीये? असा सवाल राज ठाकरे यांनी सरकारला केला आहे.
https://www.facebook.com/RajThackeray/posts/887156341815516
महत्वाच्या घडामोडी-
महाविकास आघाडीमधील आणखी एका नेत्याला कोरोनाची लागण
….तर मुख्यमंत्र्यांनी प्रोटोकॉल का तोडावा?; संजय राऊतांच विरोधकांना सवाल
उद्धव ठाकरे खुदा बनू नका; प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला
आदित्य ठाकरे यांनीही ड्रग्ज टेस्ट करावी- निलेश राणे