Home महाराष्ट्र ….तर मुख्यमंत्र्यांनी प्रोटोकॉल का तोडावा?; संजय राऊतांच विरोधकांना सवाल

….तर मुख्यमंत्र्यांनी प्रोटोकॉल का तोडावा?; संजय राऊतांच विरोधकांना सवाल

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नसल्याची टीका विरोधकांकडून वारंवार केली जात आहे. याला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी कुठे बसून काम करावे, हा त्यांचा प्रश्न आहे. काम होण्याशी मतलब आहे. ‘डिजिटल इंडिया’ वापरुन पीएम काम करतात, तसंच मुख्यमंत्री काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही देश पालथा घालण्यास सांगावं,असं संजय राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदींच्या कामाची पद्धत सारखी आहे. ते एका जागेवरून यंत्रणेवर लक्ष ठेवत आहेत. मुख्यमंत्री गेले तर गर्दी होते. पंतप्रधान, राष्ट्रपती प्रोटोकॉल तोडत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी का तोडावा?, असा सवालही संजय राऊतांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी-

उद्धव ठाकरे खुदा बनू नका; प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला

आदित्य ठाकरे यांनीही ड्रग्ज टेस्ट करावी- निलेश राणे

मुंबई पोलिसांचा अपमान सहन करणार नाही; निलेश राणेंनी कंगणा राणावतला चांगलंच सुनावलं

सर्वाधिक काळ घरात राहणारे उद्धव ठाकरे राज्याच्या इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री असतील- प्रविण दरेकर