कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मोठा निर्णय घेणार- अजित पवार

0
246

औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कुणीही मास्क घालत नाही हे अत्यंत घातक आहे. याची आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. ते औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोनावर कोणीही राजकारण करू नये, असंही अजित पवार म्हणाले. रुग्ण वाढत असल्यानं कोरोनासंदर्भात कडक निर्बंध पुन्हा एकदा लागू करण्यात येण्याचे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत.

दरम्यान, ग्रामस्थ आणि नागरिक मास्क वापरत नाहीत. उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार असून, उद्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोरोनासंदर्भात कठोर निर्णय कदाचित घ्यावे लागतील, असा इशाराही अजित पवारांनी यावेळी दिला.

महत्वाच्या घडामोडी 

…त्यामुळे शरद पवारांची जीभ घसरली असेल- राम शिंदे

“सत्ता गेल्याने भाजप अस्वस्थ, त्यांना फस्ट्रेशन आलंय”

शिवसेना हिंदुत्वापासून दुरावली आहे; अमित ठाकरेंचं शिवसेनेवर टीकास्त्र

‘ये नैना डरे डरे’! अमृता फडणवीसांचं नवीन गाणं रिलीज; पहा व्हिडिओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here