आता नारायण राणेंना सुखानं झोप लागेल- शरद पवार

0
433

कोल्हापूर : भाजप नेते नारायण राणे यांची  राज्य शासनाने सुरक्षा व्यवस्था कमी केली यानंतर त्यांना केंद्राने सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे. त्यावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नारायण राणेंवर निशाणा साधलाय.

केंद्राच्या सुरक्षा व्यवस्थेमुळे तरी राणेंना सुखाने झोप लागेल, असं म्हणत शरद पवार यांनी नारायण राणेंना टोला लगावलाय. ते शुक्रवारी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

कायदा-सुव्यवस्था याचा नेमकाविचार करून कोणाला किती सुरक्षा पुरवायची याचा निर्णय राज्य शासन घेत असते. त्यानुसार राज्य शासनाने निर्णय घेतला असताना केंद्र शासनाने त्यामध्ये हस्तक्षेप करून पुन्हा नव्याने सुरक्षा पुरवली आहे; ही पद्धत योग्य नव्हे, असं शरद पवार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“सरकार पाडण्यासाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत प्रयत्न, पण…”

“नाशिक महापालिकेच्या इमारतीला आग”

आपल्या विचारांचा नेता मुख्यमंत्री व्हावा असं सगळ्यांनाच वाटतं, त्यात गैर काय?- सुप्रिया सुळे

मला मुख्यमंत्री व्हावंसं वाटलं तर काय करु?- शरद पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here