भाजपला टीकेबद्दल ‘भारतरत्न’ द्यायला हवा; संजय राऊतांचा टोला

0
383

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार हल्लाबोल करत आगामी काळात राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू केल्याने त्यांच्यावर विरोधकांनी टीका केली आहे. या टीकेलीही राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. भाजपचे काही लोक टीका करत आहेत. कोणत्याही विषयावर ते टीका करत असतात. टीका करणाऱ्या भाजपच्या काही लोकांना भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे. त्यांना लोकं मारायची आहेत., असं म्हणत राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांना लोकांचा जीव वाचवायचा आहे. संचारबंदी लावण्याचा मुख्यमंत्र्यांना आनंद होत नाही, तुमचा जीव वाचावा म्हणून त्यांनी संचारबंदी लागू केली आहे, असं संजय राऊत म्हणाले. तसेच आगामी काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशाचे पंतप्रधान होणार असल्याचा दावा संजय राऊतांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी-

“अभिनेत्री रकुल प्रीत सिंहला कोरोनाची लागण”

“…अशा देशात आता जगण्याची इच्छा राहिलेली नाही”

मुंबईमधील ड्रॅगनफ्लाय क्लबवर पोलिसांचा छापा; सुरेश रैना, सुझेन खानसह 34 जणांवर गुन्हा दाखल

“धक्कादायक! लंडनहून विमानाने भारतात आलेले ‘इतके’ प्रवासी आढळले कोरोना पाॅझिटिव्ह”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here