औरंगाबाद : राज्य सरकारने एक सप्टेंबरपासून मंदिरं उघडावीत, आम्ही दोन तारखेला सर्व मशिदी उघडू, असे अल्टिमेटम एमआयएम नेते आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट करून राज्य सरकारला सांगितलं होतं. मात्र अनलॉकच्या चौथ्या टप्प्यातही धार्मिक स्थळे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी न दिल्याने एमआयएम आक्रमक झाली आहे.
मंदिरं उघडण्यासाठी पुजाऱ्यांना एमआयएम निवेदन देणार आहे. औरंगाबादमधील खडकेश्वर मंदिरातील पुजाऱ्यांची एमआयएम भेट घेणार आहे. निवेदन देऊन मंदिर उघडण्याची विनंती करणार आहे. तर मशिदी उघडण्याची एमआयएमची मोहीम उद्यापासून सुरु होणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
मोदी सरकार निर्लज्ज, ते त्यांची चूक मान्य करणार नाहीत; पी. चिदंबरम यांची मोदी सरकारवर टीका
मंदिर, मस्जीद उघडा अन्यथा…; रामदास आठवलेंचा राज्य सरकारला इशारा
पंतप्रधान मोदींचाही स्वॅब घ्या, त्यांचा रिपोर्टही पॉझिटिव्ह येईल; प्रकाश आंबेडकरांचा टोला
पाया पडतानाचा फोटो ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून प्रणव मुखर्जींंना श्रद्धांजली