मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील मंदिरं खुली करावी या मागणीसाठी पंढरपूर येथे आंदोलन केलं. यानंतर रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनीही राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
लॉकडाऊन आणि सुरक्षा नियमांचं पालन करून पोलीस बंदोबस्तात 8 सप्टेंबरपर्यंत मंदिर, मस्जीद, चर्च, देरासर, गुरुद्वारा, बुद्धविहार यांसह सर्वच धर्मीयांची प्रार्थनास्थळे खुली करावीत, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.
दरम्यान, तसेच 8 सप्टेंबरपर्यंत मंदिरे न उघडल्यास 9 सप्टेंबरपासून रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वात आंदोलन केलं जाईल, असा इशाराही रामदास आठवले यांनी राज्य सरकारला दिला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
पंतप्रधान मोदींचाही स्वॅब घ्या, त्यांचा रिपोर्टही पॉझिटिव्ह येईल; प्रकाश आंबेडकरांचा टोला
पाया पडतानाचा फोटो ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून प्रणव मुखर्जींंना श्रद्धांजली
“अखेर राज्य सरकारकडून ई-पासची अट रद्द”
भारताने एक प्रख्यात राजकारणी आणि शूर मुलगा गमावला; शरद पवारांचं भावूक ट्विट