मुंबई : एका जिल्ह्यातून दुसर्या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी लागणाऱ्या ई पासची अट अखेर रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
महाराष्ट्रामध्ये जेंव्हा लाॅकडाउनला सुरूवात झाली तेंव्हापासून एका जिल्ह्यातून दुसर्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई पासची आवश्यकता होती, पण आज जो महत्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला त्यामध्ये एका जिल्ह्यातून दुसर्या जिल्ह्यात जाण्यासाठी 2 सप्टेंबर पासून ई पासची आवश्यकता लागणार नाही, असं अनिल देशमुख यांनी ट्विट करत सांगितलं आहे.
#Breaking महाराष्ट्रात आता प्रवासासाठी ई-पासची गरज नाही; २ सप्टेंबरपासून निर्णयाची अंमलबजावणी #Maharashtra #Pass #Coronavirus pic.twitter.com/bIvYcpGcJa
— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 31, 2020
महत्वाच्या घडामोडी-
भारताने एक प्रख्यात राजकारणी आणि शूर मुलगा गमावला; शरद पवारांचं भावूक ट्विट
देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन
पूरग्रस्त्यांना दिलेला शब्द सलमान खानने पाळला; उचललं ‘हे’ मोठं पाऊल