500 वर्षांची प्रतीक्षा संपली; योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केल्या भावना

0
159

अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. संपूर्ण देशाचं लक्ष या कार्यक्रमाकडे लागलं होतं. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उपस्थितांना संबोधित करताना 500 वर्षांची प्रतीक्षा संपली असल्याचं म्हटलं आहे

“या क्षणामागे 500 वर्षांचा संघर्ष, साधना आहे. भारताची लोकतांत्रिक मूल्य, कायदेशीर प्रक्रिया, संविधानाची संमती या सगळ्या प्रक्रियेतून जात आज हा दिवस दिसतो आहे,
असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

दरम्यान, या क्षणाची वाट पाहत अनेक पिढ्या गेल्या. अनेक महापुरुषांनी बलिदान दिलं. आपल्या डोळ्यांसमोर राम मंदिर उभं राहावं अशी अनेकांची इच्छा होती. नरेंद्र मोदींनी कायदेशीर तसंच शांततेच्या मार्गाने समस्येचं निराकरण कसं केलं जातं हे दाखवून दिलं आहे. नरेंद्र मोदींमुळे हा क्षण सत्यात उतरला आहे,” असं योगी आदित्यनाथ यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी-

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजन सोहळा संपूर्ण

भारत आता धर्मनिरपेक्ष राहिला नाही; राम मंदिर भूमिपूजनावरुन पाकिस्तान सरकारचं वक्तव्य

राम मंदिर पायाभरणीच्या दिवशी राऊतांनाझाली बाळासाहेबांची आठवण; पोस्ट केला खास फोटो

“आज अयोध्येच्या व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘ही’ घोषणा करावी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here