मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी भाजपने घंटानाद आंदोलन केलं आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मंदिरावर अनेकांचे उदरनिर्वाह अवलंबून आहेत. देव मंदिरात बंदिस्त व्हावे ही आमची भूमिका नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मंदिरे बंद करावी हा निर्णयच केंद्राचा होता. देव मंदिरात बंदिस्त व्हावे, ही आमची भूमिका नाही. केंद्रातील मंत्रीच म्हणतात की कोरोना ही देवाची करणी आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, भाजपच्या घंटानाद आंदोलनाआधीच आमच्यापर्यंत व्यथा पोहोचली. लोकांच्या आरोग्यासाठी निर्णय घेतले असतील, तर भाजपने सरकारशी चर्चा करावी, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात उद्या पंढरपुरात आंदोलन”
राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याला कोरोनाची लागण; स्वत: फेसबुक पोस्ट करून दिली माहिती
फक्त सत्तेच दार बंद झाल्याने भाजपचा घंटानाद; रूपाली चाकणकरांची भाजपवर टीका
दरोडेखोरांचा हल्ला; क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या काकांचे निधन