Home क्रीडा दरोडेखोरांचा हल्ला; क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या काकांचे निधन

दरोडेखोरांचा हल्ला; क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या काकांचे निधन

चंदिगढ : पंजाबच्या पठाणकोट जिल्ह्यात राहणाऱ्या क्रिकेटपटू सुरेश रैना याच्या काकांच्या कुटुंबावर रात्री दरोडेखोरांनी हल्ला केला होता. याच हल्ल्यात रैनाच्या काकांचे निधन झाले. रैनाच्या काकीसह कुटुंबातील चार सदस्य जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुख्यात काले कच्छेवाला टोळीचे तीन ते चार दरोडेखोर चोरीच्या इराद्याने आले होते. पठाणकोटमधील माधोपूरजवळील थारियाल गावात राहणाऱ्या अशोक कुमार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर टोळीने हल्ला केला. 58 वर्षीय अशोक कुमार यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने रात्रीच त्यांचा मृत्यू झाला.

हल्ल्याच्या वेळी कुटुंबातील सर्व जण आपल्या घरातील गच्चीवर झोपले होते. तसेच घरातील काही रोकड आणि सोने लुटून दरोडेखोरांनी पोबारा केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, याच कारणास्तव सुरेश रैना आयपीएलमधून माघार घेत मायदेशी परतल्याचे बोलले जात आहे.

महत्वाच्या घडामोडी-

एमएसईबी कार्यालय फोडणाऱ्या मनसैनिकाला राज ठाकरेंचा फोन; म्हणाले…

अनलॉक-4 च्या गाईडलाईन्सची घोषणा; ‘हे’ सुरू होणार

नरेंद्र मोदींवर चित्रपट बनवणाऱ्या संदीप सिंहचा भाजप संबंध तपासा; गृहमंत्र्यांचे सीबीआयला निवेदन

माझा अभ्यास तुमच्या इतका नाही, तरीही…; रोहित पवारांचं देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर