Home देश अनलॉक-4 च्या गाईडलाईन्सची घोषणा; ‘हे’ सुरू होणार

अनलॉक-4 च्या गाईडलाईन्सची घोषणा; ‘हे’ सुरू होणार

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉक-4 च्या गाईडलाईन्सची घोषणा केली आहे. अनलॉक-4 च्या गाईडलाईन्सची 1 सप्टेंबरपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या गाईडलाईन्सनुसार कंटेनमेंट झोन सोडून इतर भागांमध्ये जास्त सूट देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबरपासून अनलॉक-4 ची प्रक्रिया सुरू होणार असली, तरी 30 सप्टेंबरपर्यंत शाळा, कॉलेज बंदच राहणार आहेत. पण देशातील आयटीआय सुरू करण्यास परवानगीही देण्यात आली आहे. अनलॉक-4मध्ये मेट्रो सेवा सुरू करण्याला परवानगी देण्यात आली आहे.

21 सप्टेंबरपासून सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय मेळावे, धार्मिक, शैक्षणिक, स्पोर्ट्स, मनोरंजनाच्या कार्यक्रमांना परवानगी दिली जाईल, पण यासाठी फक्त 100 लोकच येऊ शकतील. 21 सप्टेंबरपासून ओपन एयर थिएटर्सही उघडता येणार आहेत. पण सिनेमा हॉल, स्विमिंग पूल आणि थिएटर 30 सप्टेंबरपर्यंत बंदच असतील.

दरम्यान, केंद्र सरकारने या गाईडलाईन्सची घोषणा केली असली तरी राज्य सरकार मात्र यावरचे निर्बंध कायम ठेवू शकते.

महत्वाच्या घडामोडी-

नरेंद्र मोदींवर चित्रपट बनवणाऱ्या संदीप सिंहचा भाजप संबंध तपासा; गृहमंत्र्यांचे सीबीआयला निवेदन

माझा अभ्यास तुमच्या इतका नाही, तरीही…; रोहित पवारांचं देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर

अभिनेता सुशांत सिंह राजपूतला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर

शिवसेनेच्या ‘या’ आमदाराला कोरोनाची लागण; अतिदक्षता विभागात उपचार