“आपल्याच भावाचे 7 नगरसेवक फोडणाऱ्यांना या 5 जणांना परत घेताना तरी लाज वाटेल का?”

0
175

मुंबई : गेल्या चार दिवसांपूर्वी पारनेरमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. या नगरसेवकांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर शिवसेनेत घरवापसी झाली. यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं

गेल्या तीन वर्षांपूर्वी मुंबईतील मनसेच्या सात नगरसेवकांनी शिवेसेनेत प्रवेश केला होता. याची आठवण करून देत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

आपल्याच भावाचे सात नगरसेवक फोडणाऱ्यांना या पाच जणांना परत घेताना तरी लाज वाटेल का? असा सवाल करत जे एका भावाला नाही जमलं ते अजित दादांनी शब्दासाठी करून दाखवलं, असा टोला नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार; घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय

राजगृह निवासस्थान तोडफोडप्रकरणी रामदास आठवलेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

दोन करोना पॉझिटिव्ह नेत्यांच्या संपर्कात आल्यामुळे अमोल कोल्हे क्वारंटाइन

“राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here