“पवार साहेबांचा वारसा यशस्वीपणानं चालत असल्याचं अजित दादांनी आज सिद्ध केलं- रूपाली पाटील”

0
652

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सिंधुदुर्ग : सोशल मीडियावर आज एका रणरागिणीचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचं पहायला मिळालं. हा व्हायरल झालेला फोटो महिला कॉन्स्टेबल तृप्ती मुळीक यांचा आहे.

तृप्ती मुळीक या मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील अंबप पाडळी येथील आहेत. तसेच व्हायरल झालेल्या या फोटोत सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचे सारथ्य तृप्ती मुळीक यांनी केल्याचं बघायला मिळालं. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : संस्था उभ्या करायला डोकं आणि अक्कल लागते; अजित पवारांचा राणेंना टोला

लडकी हू लढना जानती हु ! सिंधुदुर्ग दौऱ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचे सारथ्य महिला कॉन्स्टेबल तृप्ती मुळीक यांनी केले. आदरणीय पवार साहेबांनी महिलाना नेहमी संधी दिली, अजित दादानी आज महिला भगिनीवर पुन्हा विश्वास दाखवुन तोच वारसा यशस्वी चालवत असल्याचं सिद्ध केल, असं रूपाली पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दिर्घायुष्यासाठी पायी बालाजीला निघालेल्या शिवसैनिकाचा वाटेतच मृत्यू “

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलताना काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्याची जीभ घसरली; म्हणाले…

…म्हणून मी भाजप नेत्या मनेका गांधी यांची भेट घेतली; जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं कारण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here