मुंबई : अंतिम वर्षाची परीक्षा घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यावरून भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्याला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्यत्तर दिलं आहे.
आमची परीक्षेबाबतची भूमिका तुमच्यासारखी राजकीय नाही तर विद्यार्थ्यांच्या काळजीपोटीच होती व राहिल. पण बबड्याची सीरिअल पाहण्यात वेळ घालवण्याऐवजी विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली असती तर तुम्हालाही हे पटलं असतं, असं म्हणत रोहित पवार यांनी आशिष शेलार यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे.
दरम्यान, बबड्याच्या हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला. त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला. आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो, पण अहंकार. ऐकतं कोण? असं आशिष शेलार म्हणाले होते.
आमची परिक्षेबाबतची भूमिका तुमच्यासारखी राजकीय नाही तर विद्यार्थ्यांच्या काळजीपोटीच होती व राहील. पण @ShelarAshish जी बबड्याची सिरिअल पाहण्यात वेळ घालवण्याऐवजी विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली असती तर तुम्हालाही हे पटलं असतं.आता त्यासाठी किमान आपल्या tweet खालील रिप्लाय तरी वाचाल. https://t.co/5rxIwyU2Rt
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 28, 2020
महत्वाच्या घडामोडी-
निलेश राणे यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह
भाजप कुठल्याही विषयात राजकारण करु शकतं; मंदिरं खुली करण्याच्या आंदोलनावरुन रोहित पवारांचा टोला
बबड्याच्या हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला- आशिष शेलार
आयपीएलच्या आधी चेन्नई सुपर किंग्जला धक्का; संघातील एका खेळाडूसह 12 जण कोरोना पाॅझिटिव्ह