मुंबई : अंतिम वर्षाची परीक्षा घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यावरून भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
बबड्याच्या हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला. त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला. आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो, पण अहंकार. ऐकतं कोण? असं म्हणत आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने अखेर न्याय दिला, असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी युवासेनेच्या वतीनं आदित्य ठाकरेंनी याचिका दाखल केली होती. यावरुन शेलारांनी टीकास्त्र सोडलं आहे.
एका “बबड्याच्या” हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला…त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला…
आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो पण.. अहंकार…! ऐकतो कोण?
मा. सर्वोच्च न्यायालयाने अखेर न्याय दिला!
(2/3)— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 28, 2020
महत्वाच्या घडामोडी-
आयपीएलच्या आधी चेन्नई सुपर किंग्जला धक्का; संघातील एका खेळाडूसह 12 जण कोरोना पाॅझिटिव्ह
फडणवीस आणि मी एकत्र येणार म्हटलं, की लगेच ब्रेकिंग न्यूज; अजितदादांची टोलेबाजी
मोदी सरकारची अवस्था ही घरातील वस्तू विकायला काढणाऱ्या दारूड्यासारखी- प्रकाश आंबेडकर