Home पुणे देवेंद्र फडणवीसांचा अंतिम वर्षाच्या परीक्षांवरुन युवासेनेवर निशाणा, तर सुशांतसिंह प्रकरणावरून मुंबई पोलिसांकडे...

देवेंद्र फडणवीसांचा अंतिम वर्षाच्या परीक्षांवरुन युवासेनेवर निशाणा, तर सुशांतसिंह प्रकरणावरून मुंबई पोलिसांकडे बोट

पुणे : बाणेर येथील कोविड सेंटरचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. यावेळी अंतिम वर्षाच्या परीक्षांवरुन युवासेनेवर निशाणा साधला, तर सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांकडे बोट दाखवलं.

राज्य सरकारच्या एकतर्फी निर्णयाचा विद्यार्थ्यांवर परिणाम झाला असता. परीक्षा नसल्याचा त्यांना आज आनंद झाला असता, पण भविष्यात त्यांची डिग्री बिनकामी ठरली असती. मात्र कोर्टाने स्पष्ट निर्देश दिले आहेत, त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांचा फायदाच होईल. त्यांच्या डिग्रीला किंमत राहील, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याबाबत युवासेना आणि महाराष्ट्र सरकारची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. कुलगुरुंचे हेच मत होते. युवासेनेच्या हट्टासाठी राज्य सरकार त्याबाबत एकतर्फी निर्णय घेत होते, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

महत्वाच्या घडामोडी-

फडणवीस आणि मी एकत्र येणार म्हटलं, की लगेच ब्रेकिंग न्यूज; अजितदादांची टोलेबाजी

मोदी सरकारची अवस्था ही घरातील वस्तू विकायला काढणाऱ्या दारूड्यासारखी- प्रकाश आंबेडकर

परीक्षा तर होणारच; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

ठाकरे सरकार राज्यपालांचे पंख छाटण्याच्या तयारीत- नितीन राऊत