मुंबई : विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यातील संघर्ष वारंवार पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी सरकार राज्यपालांचे पंख छाटण्याच्या तयारीत दिसत आहे, अशी प्रतिक्रिया ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे.
महाविकास आघाडी सरकार राज्यपालांचे पंख छाटण्याच्या तयारीत दिसत आहे. राज्यपालांकडून कुलगुरू निवडीचे अधिकार काढून घेतले जाण्याची शक्यता आहे, असं नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कुलगुरु नियुक्तीत सरकारला शून्य अधिकार आहेत. समिती पाच जणांची निवड करते आणि राज्यपाल त्यापैकी एकाचे नाव ठरवतात, त्यामुळे राज्यपालांचे अधिकार कमी करण्याच्या सरकारच्या हालचाली असून कायदा विभागाकडून अभिप्राय मागवला जात आहे, असंही नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
अन्यथा पुढील 50 वर्षे काँग्रेसला विरोधीपक्षातच बसावे लागेल; काॅंग्रेसच्या ‘या’ नेत्याचे वक्तव्य
खासदार संजय जाधव यांनी राजीनामा दिलाच नाही, तर मग…; एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया