Home महाराष्ट्र खासदार संजय जाधव यांनी राजीनामा दिलाच नाही, तर मग…; एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

खासदार संजय जाधव यांनी राजीनामा दिलाच नाही, तर मग…; एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

मुंबई : शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे खासदारकीचा राजीनामा पाठवला होता. यावरून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माझ्यासमोर संजय जाधव हे उद्धव ठाकरे यांना भेटले आहेत. त्यांची कामे मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर घातली आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांची कामे करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. मी तिथेच होतो. त्यामुळे त्यांची नाराजी कुठे जाणवली नाही. तसेच त्यांनी राजीनामाच दिला नाही, त्यामुळे तो मागे घेण्याचाही विषय येत नसल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

महाराष्ट्र सांभाळता येत नाही, आणि…; संजय राऊतांच्या वक्तव्यावरुन नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

पृथ्वीराज चव्हाणांना निवडून येण्यासाठी शरद पवारांची मदत घ्यावी लागते, तर हरकत काय? बाळासाहेब थोरातांचा राऊतांना प्रतिप्रश्न

देवेंद्र फडणवीस देशातील सर्वोत्तम विरोधी पक्षनेता; संजय राऊतांनी केलं कौतुक

“मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा”